शंकराचार्य उवाच | भावार्थ वचनामृत आणि स्तोत्रपाठ | Audiobook
शंकराचार्य उवाच | भावार्थ वचनामृत आणि स्तोत्रपाठ | Audiobook
वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता यांचे सार म्हणजेच आदि शंकराचार्य यांची ही अमृत वचने :
आदि शंकराचार्य : वेद आणि उपनिषदांचे भाष्यकार, ‘अद्वैत वेदान्त’ मताचे प्रवर्तक आणि संस्कृत भाषेतील पिढयपिढ्यांच्या ओठांवर रुळलेली सुमधुर स्तोत्रे आणि वचनपाठांचे रचयिता म्हणून आदि शंकराचार्य हे सर्वानाच परिचित आहेत. अवघ्या 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या शंकराचार्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यन्त संपूर्ण भारतभर भ्रमण करून अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता यांना ‘प्रस्थान त्रयी’ म्हणजेच आत्मिक मुक्तीचा मार्ग म्हणून त्यांनी भारतभर सर्वदूर मार्गदर्शन केले.
कर्मकांडांचे प्राबल्य माजलेल्या वैदिक संस्कृतीला ज्ञानमार्गावर आरुढ करण्याचे काम त्यांनी आपल्या ज्ञानाधिष्ठित युक्तिवादाने आणि असीम प्रेमभावनेने साध्य केले. निर्गुण, निराकार आणि निर्विकल्प अशा ब्रह्माचे स्वरूप विषद करत असतानाच त्यांनी आपल्या स्तोत्रपाठातून भावनेने ओतप्रोत अशी सगुण ईश्वराची स्तुतीही गाईली. जीव आणि ब्रह्म यात कोणताही भेद नाही आणि केवळ अविद्येमुळे जीव आणि ब्रह्म यांची ताटातुट होते आणि ही अविद्या म्हणजेच ‘माया’ आहे, अशी शिकवण त्यांनी दिली. या मायेचे स्वरूप समजावून सांगत मानवी जगण्याचे सार्थक कसे करावे याचे लोकशिक्षण करण्यासाठी त्यांनी संन्यास आश्रमाची ध्वजा उंच केली आणि भारताच्या चार दिशेला मठांची स्थापना केली. उपासक आणि उपास्य हे वेगवेगळे नसून एकच आहेत असा भक्तिभाव त्यांनी शिकवला. ‘आत्मन’ अर्थात स्वतःतील अंतरात्म्याला जाणणे म्हणजेच परमात्म्याला जाणणे असे सांगून या प्रवासाचा मार्ग त्यांनी आपल्या ‘शांकरभाष्य’ आणि ‘उपदेश साहस्त्री’ या ग्रंथांतून तसेच निरतिशय सुंदर स्तोत्रातून उलगडून सांगितला.
‘शंकराचार्य उवाच’ या ऑडिओ बुक च्या माध्यमातून आदि शंकराचार्य रचित ग्रंथातील अमृत वचने साध्या सोप्या मराठीतून विषयानुरूप सूत्रबद्धपणे सांगितली आहेत. याशिवाय त्यांची रोजचा परिपाठ म्हणून श्रवण किंवा पठण करण्यासारखी अवीट गोडीची स्तोत्रे काही पठणरूप व काही गायनरूप समाविष्ट केली आहेत.
यामध्ये एकूण ११ प्रकरणे आहेत.
(एकूण कालावधी २ तास)
PRODUCT INFO
AUDIOBOOK.
Language: Marathi. Duration: 3 Hours Approx.
Credits:
- मूळ लेखन: आदि शंकराचार्य, मराठी अनुवाद : स्वामी वागीश्वरानंद
- पठण आणि अभिवाचन : जी.ए.आडकर, रश्मी नायगावकर.
- पार्श्वसंगीत : जसराजन
- संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
- निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
- ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून
Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case or 1 Mp3 Audio USB Card
Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case.
Product Details & Index Card Included in the pack.
Free Gift Wrap Available.
RETURN & REFUND POLICY
We provide free replacement for any kind of defects.
All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.
But, We can not offer return or refund facility.
SHIPPING INFO
Orders will be accepted only from India.
Safe & Secure Doorstep Delivery.
Shipping Charges Extra.