top of page
संस्कार ज्ञानेश्वरी | Foundation Course | Audiobook

संस्कार ज्ञानेश्वरी | Foundation Course | Audiobook

SKU: 364215375135191

बालकिशोरांसाठी संस्कार ज्ञानेश्वरी | Foundation Course | Audiobook

 

बालकिशोर आणि पालकांसाठी ज्ञानेश्वरीचा 'फाउंडेशन कोर्स'

नवीन पिढीसहित आपणही ज्ञानेश्वरी उत्तमपणे कशी  शिकायची? यासाठी अत्यंत सुगम आणि सुलभपणे ज्ञानेश्वरीचा आणि श्रीमद्भगद्गीतेचा अंतरंग परिचय करून देणारा हा पायाभूत ऑडिओ कोर्स आहे. 

 

संत एकनाथांनी 'श्री ज्ञानेश्वरी' ग्रंथाचा गौरव करताना प्रत्येक माणसाने यातील 'एक तरी ओवी अनुभवावी' असे म्हटलेले आहे. सर्वसामान्य लोकांच्या प्राकृत मराठी भाषेपासून दुरावलेले आणि पंडितजनांपुरत्या सीमित झालेल्या संस्कृत भाषेत बंदिस्त झालेले ज्ञानभांडार सर्वांसाठी खुले करण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्या ग्रंथाद्वारे केले तो म्हणजे ग्रंथराज 'ज्ञानेश्वरी'. मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म यांची ध्वजा त्यांनी सर्वप्रथम उंच केली. त्यामुळेच 'ज्ञानदेवे रचिला पाया' असे म्हटले जाते.

 

परंतु काळाच्या ओघात भाषेत झालेल्या बदलांमुळे आज जवळजवळ सातशे वर्षानंतर ज्ञानेश्वरीची ही प्राकृत मराठी भाषा आजच्या पिढीला समजायला कठीण जाते. अनेक जणांनी हा म्हातारपणी  वाचण्याचा ग्रंथ अशी समजूत करून घेतलेली दिसते. वाचू वाचू म्हणत अनेकांचे अनेकांचे आयुष्य संपून जाते पण वाचन काही घडत नाही. पण खरे तर लहान वयापासूनच ज्ञानेश्वरीचा ज्ञानपाठ देण्याची आवश्यकता आहे. परंतु तब्बल नऊ हजार ओव्यांच्या या ग्रंथातील गुह्य ज्ञान एकदम समजणे कठीण आहे.

 

म्हणूनच पाल्य, पालक आणि शिक्षक अशा लहानथोर सर्वांसाठी 'फाऊंडेशन कोर्स' स्वरूपातील हा 'संस्कार ज्ञानेश्वरी'. ऑडिओ कोर्स.  प्रत्येक अध्यायातील निवडक ओव्यांचे पठण-निरूपण आणि गायन या स्वरूपात १०८ ओव्यांच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञानेश्वरी आणि श्रीमद्भगवद्गीतेचे अत्यंत सोप्या रीतीने सारभूत निरूपण या ऑडिओ बुकद्वारे केले आहे. पालक व शिक्षकांनी ही 'संस्कार ज्ञानेश्वरी' मुलांसोबत नेमाने व प्रेमाने ऐकावी अशीच आहे. याद्वारे १०८ ओव्या सार्थपणे सहज तोंडपाठ होऊ शकतील आणि नित्य गुणगुणल्या जातील. मराठी भाषा आणि हिंदू तत्त्वज्ञान या दोन्ही दृष्टीने हा महत्त्वाचा मूल्यसंस्कार ठरेल. 

 

यामध्ये एकूण १९ प्रकरणे आहेत. 

(एकूण कालावधी : तीन तास)

 

To purchase lifetime online streaming of this Audiobook please follow the link below>>

https://www.pustakvaani.com/challenge-page/sanskar_dnyaneshwari

 • PRODUCT INFO

  AUDIOBOOK. 

  Language: Marathi. Duration: 3 Hours Approx.

  Credits:

  • मूळ लेखन: संत ज्ञानेश्वर, भावार्थ निरूपण : शैलजा मुकुंद सबनीस. 
  • गायन: शिवानी कराडकर, पठण : जी. ए. आडकर, भावार्थ निवेदन: रश्मी नायगावकर. 
  • संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
  • निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
  • ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून 

  Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case or 1 Mp3 Audio USB Card

  Product Details & Index Card Included in the pack. 

  Free Gift Wrap Available. 

 • RETURN & REFUND POLICY

  We provide free replacement for any kind of defects. 

  All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.

  But, We can not offer return or refund facility. 

 • SHIPPING INFO

  Orders will be accepted only from India. 

  Free doorstep delivery in Pune & Pimpri Chinchwad. 

  Free shipping by Indian Post for the rest of Maharashtra. 

₹495.00 Regular Price
₹399.00Sale Price
bottom of page