About
‘जिथे जीव तिथे शिव’ हा प्रत्यक्ष अनुभूतीतून आलेला संदेश आणि ‘सर्व धर्म हे एकाच ध्येयाचा ध्यास घेतात, परंतु प्रत्येकाचा मार्ग आणि प्रत्येकाची नामे वेगवेगळी आहेत’, हा महान समन्वयाचा उपदेश, धार्मिक साम्राज्यवादात आणि आर्थिक सत्तास्पर्धेत गुंतलेल्या राष्ट्रांना आणि समाजाला देणारे थोर दार्शनिक म्हणून रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आणि उपदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. जगाला आणि खुद्द भारतालाच भारतीय तत्त्वज्ञानाची नव्याने ओळख करून देणारा स्वामी विवेकानंद यांच्यासारखा शिष्य आणि अशा कैक शिष्यांचा संघ त्यांनी घडवला. आजही रामकृष्ण मिशन संपूर्ण जगभर सेवा, समर्पण, त्याग आणि अखंड ज्ञानप्रसार यांचे कार्य करत आहे. >> या ऑडिओबुकमध्ये श्रीरामकृष्ण परमहंस यांचे जीवन चरित्र आणि निवडक जीवन उपदेश कथन केला आहे. >> यामध्ये एकूण १५ प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : ४ तास)
You can also join this program via the mobile app. Go to the app