top of page

संगीतशास्त्र | Series of 5 Audiobooks

  • 32 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

संगीतशास्त्र | कशासाठी व कुणासाठी? >> संगीताचा मोठा प्रभाव वृक्षवेली तसेच पशू-पक्षी यांच्यावरही पडतो हे आता आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे. आजच्या काळात विविध मानवी शारीरिक व मानसिक आजारांवरील उपचार पद्धती म्हणूनही संगीताची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. >> शास्त्रीय संगीत आणि विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीत हे 'आत्म्याचे परमात्म्याशी मीलन घडवून देणारा साधनामार्ग' मानला जातो. हे शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते पण त्यातील बारकावे कळत नाहीत अशी अनेकांची अडचण असते. आपण जे संगीत ऐकतो, शिकतो किंवा सादर करतो ते अधिक चांगल्या रीतीने ऐकण्यासाठी, शिकण्यासाठी किंवा सादर करण्यासाठी, तसेच आपली संगीत अभिरुची आणि आपली संगीताविषयीची समज वाढवण्यासाठी संगीतशास्त्राचा मूलभूत अभ्यास प्रत्येकाला उपयुक्त ठरेल. >> कोणत्याही शास्त्राची ‘थियरी’ आणि ‘प्रॅक्टिकल’ ही दोन प्रमुख अंगे असतात. गायन किंवा वादनाचा 'रियाज' म्हणजे सराव जितका महत्त्वाचा आहे तितकेच संगीतातील मूलभूत शास्त्रीय संकल्पना, व्याख्या, सिद्धांत आणि प्रक्रिया समजून घेणे संगीताचे विद्यार्थी तसेच रसिक सर्वांना आवश्यक आहे. >> ‘संगीतशास्त्र’ या पाच ऑडिओबुकच्या विशेष श्रवण मालिकेत पुढील क्रमाने संगीतातील मूलभूत तत्त्वांचा विस्तृत व सुबोध परिचय करून देण्यात आला आहे. >> ऑडिओबुक १ >> संगीतशास्त्र | बेसिक | स्वर-रचनाशास्त्र ऑडिओबुक २ >> संगीतशास्त्र | भाग १ | आवाजसाधना / कंठसाधनाशास्त्र ऑडिओबुक ३ >> संगीतशास्त्र | भाग २ | संगीत शिक्षण व संगीत समीक्षा ऑडिओबुक ४ >> संगीतशास्त्र | भाग ३ | संगीत : सौन्दर्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र ऑडिओबुक ५ >> संगीतशास्त्र | भाग ४ | संगीत प्रकार : भक्तीसंगीत, चित्रपट संगीत, नाट्य संगीत >> ऐकताय ना? ऐकत रहा!

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹2,399.00

Share

bottom of page