top of page

सार्थ संस्कार ज्ञानेश्वरी | Audiobook

  • 20 Steps

About

सार्थ संस्कार ज्ञानेश्वरी | विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी >> (स्वरूप : शालेय अभ्यासक्रम आणि महाविद्यालयीन शिक्षणात अभिजात मराठी भाषेतील 'ज्ञानेश्वरी' या महत्त्वाच्या ज्ञानग्रंथाची जुजबी ओळख होते. परंतु त्याचा अभ्यास होत नाही. आजच्या पालकांना किंवा शिक्षकांनाही नवीन पिढीला ज्ञानेश्वरी शिकवणे अत्यंत अवघड जाते. ज्या घरांमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असतो त्यांचादेखील तो पूर्ण वाचून होत नाही. परंतु प्रत्येकाचे पूर्ण ऐकून होऊ शकते. >> “जे जे वाचणे अवघड, ते ते ऐकणे सोपे!” >> ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायातून आपल्या आजच्या व रोजच्या जगण्यासाठी काय शिकण्यासारखे आहे हे सार रूपाने जाणून घेण्यासाठी ही ‘सार्थ संस्कार ज्ञानेश्वरी’ श्रवण मालिका आहे. या ऑडिओबुकमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे सार सांगणाऱ्या, गाभा शिकवणाऱ्या सर्वांसाठी सुयोग्य अशा निवडक ओव्यांचे गायन-पठण आणि अगदी सोप्या भाषेत रोजच्या जगण्यातील उदाहरणे देत भावार्थ निरूपण केले आहे. >> ‘एक तरी ओवी अनुभावावी’ असा ज्ञानेश्वरी ग्रंथाबाबत संतांचा अभिप्राय आहे. या ऑडिओबुकच्या माध्यमातून आपण त्यातील शतकाहून अधिक ओव्या भावार्थासह पठण आणि गायन स्वरूपात ऐकून, जाणून घेत मुखोद्गत (तोंडपाठ) करू शकतो. याचे नित्य श्रवण, पठण, पारायण करू शकतो. गर्भवती स्त्रिया, गृहिणी, बालकिशोर वयातील मुले-मुली, तसेच सर्व वयोगटातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांसाठी ‘ज्ञानेश्वरीचा फाउंडेशन’ कोर्स' म्हणून ही ‘संस्कार ज्ञानेश्वरी’ अत्यंत उपयुक्त आहे. >> रोज एक अध्याय याप्रमाणे ही संस्कार ज्ञानेश्वरी नियमितपणे व पुनःपुनः ऐकावी. श्रवण, मनन आणि चिंतन करावे. पाठांतर करावे. >> चला तर मग! ऐकायला सुरुवात करुयात! >> ऐकताय ना? ऐकत रहा >>

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹399.00

Share

bottom of page