About
'श्रीस्वामी समर्थ वाणी' या विशेष ऑडिओबुक चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. >> भक्तीमार्गामध्ये श्रवण उपासनेला म्हणजेच ऐकण्याला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. म्हणूनच प्रत्येक श्रीस्वामी समर्थ भक्ताला कधीही कुठेही ऐकण्यासाठी 'श्रीस्वामी समर्थ वाणी' ही विशेष ऑनलाईन वाहिनी आहे. >> या चॅनलवर दैनंदिन उपासनेसाठी 'श्रीस्वामी समर्थ संपूर्ण नित्यपाठ' आहे. यामध्ये दैनंदिन उपासनेसाठी आवश्यक ध्यान, बीजमंत्र, तारक मंत्र, स्तोत्र, नामजप, अष्टोत्तर शतनाम, सहस्रनाम, अथर्वशीर्ष, ३१ अभंगांचा स्वामीसुत कृत स्वामीपाठ इत्यादि सर्व प्रमुख नित्यपाठ आहेत. नैमित्तिक उपासनेसाठी 'चरित्रसारामृत पारायण पोथी', 'श्रीस्वामी समर्थ बखर' या ग्रंथांची संपूर्ण पारायणे आहेत. याशिवाय दत्त संप्रदायातील श्री दत्त माहात्म्य, गुरु गीता, सार्थ अवधूत गीता, सार्थ अष्टावक्र गीता इत्यादि अनेक महत्त्वाचे पारायण ग्रंथ आहेत. तसेच यामध्ये श्रीस्वामी समर्थ आणि दत्त संप्रदायातील नवीन जुनी भजने, अभंग, भक्तीगीते इत्यादि सुमधुर संगीतमय सादरीकरणे आहेत. याशिवाय कीर्तन, प्रवचन, व्याख्यान इत्यादि स्वरूपातील निवडक विशेष कार्यक्रमही या चॅनलवर सादर होत राहतील. >> 'पौर्णिमा ते पौर्णिमा' अशा ३० दिवसांच्या विशेष पारायण उपासनेसाठी सकाळच्या वेळी पाऊण तास आणि संध्याकाळच्या वेळी पाऊण तास असा संपूर्ण तीस दिवसांचा पारायण परिपाठही यामध्ये आहे. हा संपूर्ण परिपाठ कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करून पुढील पौर्णिमेपर्यंत सहकुटुंब सहपरिवार क्रमशः ऐकण्याचा परिपाठ करावा. श्रवण पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन करून सहभोजन घालावे आणि त्यावेळीही यातील निवडक पाठ सगळ्यांनी मिळून श्रवण करावा. >> वार्षिक किंवा मासिक वर्गणीदार होऊन 'श्रीस्वामी समर्थ वाणी' हा चॅनल केव्हाही कुठेही ऐकता येईल. तसेच या चॅनलचे सर्व सभासद एका विशेष ऑनलाइन ग्रुपने जोडले जातील. या ग्रुपवर आपण आपले श्रवण अनुभव, चिंतन, विचार, प्रश्न किंवा शंका इतर सदस्यांसोबत सामायिक करू शकता. >> श्रीस्वामी समर्थ यांचे एक वचन आहे. ‘समुद्र भरला आहे. घेता येईल तितके घ्यावे.” ‘श्रीस्वामी समर्थ वाणी’ या चॅनलचे सदस्य होऊन श्रीस्वामी समर्थांचे हे वचन आपण सार्थ करूया. >> चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा! ‘श्रीस्वामी समर्थ वाणी’
You can also join this program via the mobile app. Go to the app
Instructors
Price
Group Discussion
This program is connected to a group. You’ll be added once you join the program.