About
श्री स्वामी समर्थ | कौटुंबिक श्रवण उपासना भक्तीचा अनुभव... कुटुंबासोबत उपासनेचा आनंद... आणि स्वामी विचारांचे संस्कार! श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी, प्रत्येक साधकाला सहकुटुंब श्रवण करता यावी अशा स्वरूपात तयार केलेली ही पाच ऑडिओबुकची सुगम, भक्तिमय आणि उपासनेसाठी उपयुक्त श्रवणमालिका आहे. दैनंदिन उपासना, चरित्रश्रवण, लीला कथांचे पारायण आणि आत्मज्ञानाचा विचार अशा भक्तीच्या विविध पैलूंचा अनुभव या मालिकेतून घेता येतो. या मालिकेतील पाच ऑडिओबुक्स : 1. श्रीस्वामी समर्थ नित्यपाठ उपासना – दैनंदिन उपासनेसाठी स्वामी ध्यान, आवाहन, स्तोत्र, मानसपूजा, अथर्वशीर्ष, अष्टोत्तर शतनाम, स्वामीसुतांचे ३१ अभंग, तारक मंत्र आदी महत्त्वाचे संगीतमय श्रवणपाठ. 2. श्रीस्वामी समर्थ चरित्रसारामृत – २१ अध्यायांची संपूर्ण पारायण पोथी, सुगम आणि भक्तिमय श्रवणस्वरूपात. 3. श्रीस्वामी समर्थ चरित्र बखर पारायण – दिवस १ ते १० – स्वामींच्या २६४ लीला कथांचे २१ दिवसांच्या कौटुंबिक श्रवण उपासनेतील पहिले दहा दिवसांचे श्रवणपाठ. 4. श्रीस्वामी समर्थ चरित्र बखर पारायण – दिवस ११ ते २१ – चरित्र बखर पारायणातील उर्वरित अकरा दिवसांचे श्रवणपाठ. 5. सार्थ अवधूत गीता – दत्त अवधूतांनी सांगितलेल्या आत्मज्ञानपर गीतेतील मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचा सुबोध मराठी भावार्थ; दत्त संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारे श्रवण. या मालिकेच्या माध्यमातून घरातील सर्व वयोगटांतील सदस्यांना एकत्रितपणे नित्यपाठ, पारायण आणि चरित्रश्रवण करण्याची संधी मिळते. भक्तीभाव, श्रद्धा, आत्मचिंतन आणि कुटुंबातील सामूहिक आध्यात्मिक संवाद यांना प्रोत्साहन देणारी ही श्रवणमालिका प्रत्येक स्वामीभक्त कुटुंबाच्या श्रवणसंग्रहात असावी अशी आहे. “श्री स्वामी समर्थ!” — सहकुटुंब श्रवणातून भक्तीचा आनंद आणि स्वामी विचारांचा परिचय!
You can also join this program via the mobile app. Go to the app
