About
देशाचे सर्व प्रौढ नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांना आचरणात आणण्यासाठी महात्मा गांधीजींनी १८ कलमी विधायक कार्यक्रम दिला. त्याचे रहस्य व स्थान विशेष प्रवचन मालिकेतून समजावून सांगितले. >> महात्मा गांधी यांच्या दृष्टीने व्यक्तीची उन्नती हा राष्ट्राच्या उन्नतीचा पाया आहे. नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपले कुटुंब, समाज आणि राष्ट्र या बाबत काही विहित कर्तव्य करणे आवश्यक आहे. सामाजिक व राजकीय जीवनात प्राधान्याने आचरणात आणण्यासाठी काही प्रमुख सूत्रे समजावून सांगितली. >> आज एकविसाव्या शतकातही प्रत्येक शहरातील प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक गांव याठिकाणी अमलात आणण्यासाठी गांधीजींनी समजावून सांगितलेला हा ‘विधायक कार्यक्रम’ प्रभावी आहे. >> यामध्ये पुढीलप्रमाणे १८ प्रकरणे आहेत. १. जातीय ऐक्य, २. अस्पृश्यता निवारण ३. दारूबंदी, ४. खादी, ५. इतर ग्रामोद्योग, ६. ग्रामसफाई, ७. नई तालीम, ८. प्रौढ शिक्षण, ९. स्त्रियांची सेवा, १०. आरोग्य आणि स्वच्छतेचे शिक्षण, ११. प्रांतीय भाषा, १२. राष्ट्रभाषा, १३. आर्थिक समानता, १४. शेतकरी, १५. मजूर, १६. आदिवासी लोक, १७. महारोगी, १८. विद्यार्थी >>
You can also join this program via the mobile app. Go to the app