About
‘व्यक्तिमत्त्व विकास’ हा सर्वच महापुरुषांच्या शिकवणुकीचा गाभा आहे. गांधीजींच्या ‘महात्मा’ होण्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच मोठा प्रभाव आहे. या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या मागे गांधीजींचे नैतिक बळ उभे आहे. गांधीजींनी आपल्या चारित्राला ‘माझे सत्याचे प्रयोग’ असे म्हटले आहे. हा प्रवास सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व घडविण्याचा आहे. >> गांधीजींनी आपल्या अखंड चिंतनातून आणि प्रयोगशील भूमिकेतून भारतीय दर्शनांची सारभूत तत्त्वे स्वतः अभ्यासली व अंगीकृत केली. या मंथनातून गांधीजींनी सर्वांसाठी उपयुक्त असा व्यक्तिमत्त्व विकासाचा ११ कलमी कार्यक्रम दिला. तीच ही ११ सूत्रे. >> “अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह | शरीर-श्रम, अस्वाद, सर्वत्र भय-वर्जन || सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्श भावना ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रत निश्चये ||” >> महात्मा गांधीजींनी ‘मंगल प्रभात’ या प्रवचन मालिकेत दिलेली ही विशेष प्रवचने आचार्य विनोबा भावे यांनी मराठीमध्ये अनुवादित केली आहेत. >> यामध्ये एकूण १६ प्रकरणे आहेत.
You can also join this program via the mobile app. Go to the app