top of page

दीनानाथ मंगेशकर | चरित्र ओळख

  • 13 Steps

About

शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भावसंगीताच्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या थोर संगीतकारांची चरित्रे जाणून घेणे आणि त्यातून उत्तम संगीत साधक व पट्टीचे श्रोते घडण्यासाठी थोर संगीतकार चरित्रमाला ही विशेष श्रवणग्रंथ मालिका (Audiobook Series) निर्मित केली आहे. >> आधुनिक काळातील मराठी नाट्यसंगीताच्या सुवर्णयुगाचे एक शिल्पकार, मनस्वी कलावंत, महान गायक, विनम्र संगीत साधक, संगीत क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर! लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक व संगीतकार भावंडांचे पिता आणि सांगीतिक गुरु म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर! जीवनाचे संगीत आणि संगीत हेच जीवन असे प्रत्यक्ष जगणाऱ्या एका मनस्वी, अस्वस्थ कलावंताची आणि संगीत साधकाची ही चरित्र कहाणी जाणून घेणे संगीताची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी उद्बोधक आहे. >> या ऑडिओबुकमध्ये मा. दीनानाथ मंगेशकर यांचा जीवन प्रवास व सांगीतिक प्रवास उलगडून सांगणारे विशेष चरित्र कथन आहे. >> ऐकताय ना? ऐकत रहा!

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹४९९.००

Share

bottom of page