top of page

धम्म तत्त्व दर्शन | A Unique Set of 5 Audiobooks

  • 19 Steps

About

धम्म तत्त्व दर्शन | कौटुंबिक विशेष श्रवण मालिका बौद्ध धम्माचा सार, तत्त्वज्ञान, आचरण आणि ध्यान यांचे सखोल पण सहज समजणारे ज्ञान देणारी ही एक अद्वितीय ५ ऑडिओबुकची विशेष कौटुंबिक श्रवण मालिका आहे. धम्म म्हणजे केवळ धार्मिक आस्था नव्हे, तर विचार, विवेक आणि जीवनपद्धती. मन, वर्तन, आणि दैनंदिन जीवनातील निर्णय अधिक सुजाण करण्यासाठी बौद्ध धम्म जगभरातील लाखो लोकांना आजही मार्गदर्शन करतो. त्याच धम्माचे शास्त्रीय, तत्त्वचिंतनपर आणि व्यावहारिक दर्शन या मालिकेत आकर्षक पद्धतीने सादर केले आहे. धम्माच्या ज्ञानातून मन:शांती, सकारात्मक दृष्टी, करुणा, मैत्रीभाव, समतोल निर्णयक्षमता आणि सभ्य समाजनिर्मितीची प्रेरणा मिळावी, हा या संपूर्ण मालिकेचा हेतू आहे. कुटुंबासोबत एकत्र ऐकण्यासाठी उपयुक्त असणारी ही मालिका श्रवण, मनन, चिंतन आणि आचरण या चौघांवर आधारित आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजकार्यकर्ते, आध्यात्मिक साधक आणि आजच्या तणावपूर्ण जीवनात शांततेचा मार्ग शोधणाऱ्या प्रत्येकासाठी ही मालिका अत्यंत उपयुक्त आहे. या मालिकेतील ५ ऑडिओबुक : १. सार्थ धम्मपद | भाग १ | अध्याय १ ते १३ | पाली- मराठी धम्मपदातील पहिल्या १३ अध्यायांचे अर्थ, संदर्भ आणि जीवनाशी असलेले नाते स्पष्ट करणारे विवेचन. प्रत्येक श्लोकाचा आधुनिक जीवनात उपयोग कसा करता येईल याची सखोल मांडणी. २. सार्थ धम्मपद | भाग २ | अध्याय १४ ते २६ | पाली- मराठी धम्मपदाचा दुसरा महत्त्वाचा संच. धम्माद्वारे मन, वर्तन, ज्ञान, जागरूकता, करुणा आणि स्वअनुशासनाचे तत्त्वज्ञान जीवनाशी जोडून समजावून सांगितलेले. ३. संपूर्ण धम्मपद | भाग ३ | पाली पाठ संगायन समग्र २६ अध्यायांचा पाली धम्मपदाचा पारंपारिक श्रवणपाठ. उच्चारणाची लय, नादमधुरता आणि मनशांती देणारा ध्यानधार्मिक अनुभव. ४. तथागत दर्शन | धम्म बोधकथा – धम्म आचरण – धम्म ध्यान – धम्म वंदना भगीरथ घटनांवर आधारित बोधकथा, जीवनात धम्माची अमलात आणता येण्यासारखी उदाहरणे, ध्यान पद्धतीचे मार्गदर्शन आणि वंदना. ५. त्रिरत्न चिंतन | बुद्ध – धम्म – संघ | १० प्रवचने | डॉ. धम्मानंद कोसंबी त्रिरत्नांचे तत्त्वज्ञान, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व, तसेच वर्तमानकाळासाठी त्यांचे व्यावहारिक मूल्य समजावून देणारी प्रभावी प्रवचने.

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹२,३९९.००

Share

bottom of page