About
शहीद भगतसिंह यांच्या अमर बलिदानामुळे त्यांचे नाव भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे. परंतु तरुण भगतसिंह यांचा लेखक म्हणून अनेकांना परिचय नाही. भगतसिंह यांनी लिहिलेले अनेक वैचारिक लेख, निबंध आणि पत्रे प्रत्येक तरुण आणि तरुणीने अभ्यासली पाहिजेत. त्यासाठीच भगत सिंह यांच्या निवडक लेखनाची ही 'आपला, भगत सिंह' विशेष श्रवण मालिका... >> निबंध >> भगतसिंह स्वतःला नास्तिक म्हणत असत आणि त्याविषयीची त्यांची सविस्तर भूमिका त्यांनी ‘मी नास्तिक का आहे?’ या दीर्घ निबंधांत स्पष्ट केली. स्वतःला आस्तिक किंवा नास्तिक म्हणणाऱ्या प्रत्येकाने त्यांचा हा निबंध जरूर अभ्यासला पाहिजे. >> पत्रे >> त्याचप्रमाणे भगत सिंह यांनी तुरुंगातून लिहिलेल्या पत्रातून एक लेखक, एक मनस्वी तरुण, एक विचारी माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनमोल परिचय होतो. त्यांनी वडिलांना लिहिलेली दोन पत्रे, आत्महत्येचा विचार करणाऱ्या सुखदेवला लिहिलेले पत्र, पंजाबच्या तत्कालीन ब्रिटिश राज्यपालांना उद्देशून 'फाशी नको, कृपा करून आम्हाला गोळ्या घाला' अशी मागणी करणारे पत्र, तसेच फाशीच्या शिक्षेतून वाचलेल्या कॉम्रेडना सल्ला देण्यासाठी बटुकेश्वर दत्त यांना लिहिलेले पत्र तसेच ‘इन्कलाब जिंदाबाद’ या घोषणेविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वर्तमानपत्रात लिहिलेले पत्र अशी निवडक महत्त्वाची पत्रे, >> लेख >> याशिवाय ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे संविधान’, ‘पंजाबच्या नौजवान भारत सभेचा जाहीरनामा’ आणि ‘बॉम्बचे तत्त्वज्ञान’ हे निवडक लेख समाविष्ट आहेत. >> यामध्ये एकूण १० प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : २ तास ४३ मिनिटे)
You can also join this program via the mobile app. Go to the app