About
महाराष्ट्राचा इतिहास | मराठा कालखंड | पर्व दुसरे पेशवाईचा इतिहास A Unique Series of 10 Audiobooks विशेष श्रवण मालिका विषय प्रवेश : छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र शाहू महाराज यांस राज्यप्राप्तीपासून ते पेशवाईचा अस्त म्हणजे अखेरचा कालखंड इथपर्यंतचा इत्यंभूत वस्तुनिष्ठ इतिहास या विशेष श्रवणमालिकेत मांडला आहे. सन १७०७ ते १८१८ हा साधारण शंभर-सव्वाशे वर्षांचा कालखंड म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा व धामधुमीचा, गतिमान इतिहास आहे. प्रत्येक मराठी कुटुंबात याचे श्रवण उद्बोधक ठरेल. या श्रवणमालिकेमध्ये प्रत्येकी साधारण तीन तासांचे १० खंड आहेत. यामध्ये एकूण ३२ प्रमुख प्रकरणे व त्यांचे उपभाग मिळून ७५ भाग आहेत. ऐकण्याच्या सोयीसाठी प्रत्येक उपभाग साधारण २० ते ३० मिनिटांचा आहे. आपण टप्प्याटप्प्याने एकेक भाग ऐकू शकतो. चला तर मग ! ऐकताय ना? ऐकत रहा! पेशवाईचा इतिहास...
You can also join this program via the mobile app. Go to the app
