About
संगीतशास्त्र वाणी | Audiobook Channel >> संगीताच्या शास्त्राला वाहिलेली वाहिनी >> A Unique Audio Channel Dedicated to Music Theory >> गायन, वादन आणि नर्तन यांनी मिळून संगीत बनते. संगीत ही कला आहे तसेच ते एक शास्त्र आहे. संगीतातील लय, ताल आणि सूर यांना निश्चित गणिती नियम आहेत. तसेच यातील प्रत्येक गोष्ट श्वासांशी म्हणजेच श्वसन क्रियेशी थेट निगडीत आहे. त्यामुळे त्याचेही शास्त्र हा संगीत शिक्षणाचा प्रमुख भाग आहे. त्याचप्रमाणे सौन्दर्यशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र ही संगीत शिक्षणाची तीन प्रमुख शास्त्रीय अंगे आहेत. तसेच या संगीतशास्त्राला दीर्घ परंपरा आहे, खूप मोठा रंजक इतिहास आहे. त्यामध्ये शास्त्रीय संगीतातील कित्येक महान कलाकारांची चरित्रे आहेत, अनेक रंजक व बोधप्रद गोष्टी आहेत, अनेक गाण्यांच्या, छंदाच्या, संगीत प्रकारांच्या जन्मकथा आहेत, किस्से आहेत. भारतीय तसेच पाश्चात्य संगीत पद्धतीचा परिचय आहे, देशोदेशीच्या संगीताचा व संगीतकारांचा परिचय आहे, निरनिराळे संगीत प्रकार, निरनिराळी वाद्ये यांचा रंजक परिचय व माहिती आहे. संगीत शिक्षणाची भारतीय आणि पाश्चात्य परंपरा काय आहे, संगीताची समीक्षा कशी करावी किंवा शास्त्रीय संगीताचा आस्वाद कसा घ्यावा याविषयी विशेष मालिका आहे. भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत इत्यादि संगीताचे उपप्रकार याविषयी माहिती आहे. यामध्ये संगीत शास्त्रावरील महत्त्वाचे संस्कृत ग्रंथ अर्थासहित आहेत. > असे सर्व संगीताचे मूलभूत शास्त्र (Music Theory) विशिष्ट क्रमाने शिकवणारी अनेक ऑडिओ पुस्तके व मालिका आणि संगीतशास्त्र विषयक इतर अनेक विशेष ऑडिओ कार्यक्रम, मालिका, मुलाखती, व्याख्याने, चर्चासत्र, विशेष सादरीकरण इत्यादि सर्व काही एकाच ठिकाणी वर्षभर २४ x ७ ऑनलाइन ऐकायला मिळणारी एकदम विशेष वाहिनी म्हणजेच – संगीतशास्त्र वाणी | Audiobook Channel >> संगीताच्या शास्त्राला वाहिलेली वाहिनी >> सबस्क्राईब करा आणि संपूर्ण एक वर्षभर कधीही, कुठेही ऑनलाइन ऐका... त्याचप्रमाणे ‘संगीतशास्त्र वाणी’ या ऑनलाइन ग्रुपचे सदस्य होऊन संगीतशास्त्र श्रवण विषयक आपले अनुभव इतर सदस्यांसोबत शेअर करा. >> या वाहिनीवर संगीताचे मूलभूत शास्त्र शिकवणारी ३० हुन अधिक ऑडिओबुक आणि २० हुन अधिक विशेष ऑडिओ कार्यक्रम व मालिका एक वर्षभर ऐकायला मिळतील. >> Join Now | Log In | Stream
You can also join this program via the mobile app. Go to the app
Instructors
Price
Group Discussion
This program is connected to a group. You’ll be added once you join the program.