About
'थर्व' म्हणजे अस्थिर किंवा चंचल आणि 'अथर्व' म्हणजे स्थिर. चंचल मनाला, बुद्धीला आणि विचारांना स्थिर करणारे आणि त्याला आत्मबोध, परमात्मबोध आणि विश्वबोध घडवणारे स्तोत्र म्हणजे 'अथर्वशीर्ष' >> गणेश, देवी, सूर्य, नारायण आणि शिव या प्रमुख पाच देवता आहेत. अन्य सर्व देवता यातूनच उत्पन्न होतात आणि यातच लय पावतात. म्हणूनच या पाचही देवतांना मिळून 'पंचायतन' असे म्हणतात. >> जो स्वतः वाणीस्वरूप, प्रणवस्वरूप म्हणजेच प्राण आहे तो म्हणजे 'गणेश' जी अवकाशरूप, मातृरूप आणि शक्तीरूप आहे अशी 'देवी' जो अग्नीरूप, तेजोरूप, प्रकाशरूप आहे तो म्हणजे 'सूर्य' जो जीवनरूप, आनंदरूप, चालक-पालकरूप, संरक्षक संवर्धक आहे तो म्हणजे 'नारायण' जो वैराग्यरूप, आत्मरूप, लयरूप आहे तो म्हणजे 'शिव' हे या पंचायतन देवतांचे मूळ स्वरूप आहे. >> या पंचायतन अथर्वशीर्ष श्रवणाने व चिंतनाने या पाचही देवता मूलतः एकच असून जीव आणि ब्रह्म यांतील मूलभूत आंतरिक ऐक्य व अनंत बाह्य विस्तार यांचा आत्मबोध घडून येतो. जगण्याकडे बघण्याची दृष्टी अगत्यवादी होते. >> या पाचही देवतांचा तत्त्वबोध घडवणारी 'तत्त्वमसि' या महावाक्याची प्रचीती देणारी व्याकरण, छंद, वृत्त आणि वाणीचा विकास घडवणारी या पाचही देवतांची पाच अथर्वशीर्ष स्तोत्रे संगीतबद्ध स्वरूपात मूळ संस्कृत श्लोकांचे गायन पठण आणि मराठी भावार्थ निरूपण या स्वरूपात सादर केली आहेत. >> नित्य श्रवण पारायण करण्यासाठी, पाठांतर करण्यासाठी तसेच अर्थ समजून घेत चिंतन मनन करण्यासाठी ही श्रवण मालिका अत्यंत उद्बोधक आणि आनंद देणारी आहे.
You can also join this program via the mobile app. Go to the app