top of page

सार्थ मनोबोध | श्रवण मालिका

  • 9 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

सार्थ मनोबोध | श्रवण मालिका >> संत समर्थ रामदास विरचित २०५ मनाचे श्लोक >> (पठण आणि भावार्थ निरूपण) >> स्वरूप : मुले तसेच मोठी माणसे सर्वांना उपयुक्त असा ‘मनोबोध अर्थात मनाचे श्लोक’ हा ग्रंथ. या ऑडिओबुकमध्ये मनोबोध ग्रंथातील प्रत्येक श्लोकाचे गायन-पठण आणि सोप्या मराठीत भावार्थ निरूपण केले आहे. बऱ्याचदा अनेकांचे यातील अनेक श्लोक तोंडपाठ असतात. परंतु त्याचा अर्थ नीट जाणून घेतलेला असंतोच असे नाही. श्रवण - मनन - चिंतन आणि निदिध्यासन (म्हणजे सततचा ध्यास) अशी अभ्यासाची चतु:सूत्री शास्त्रात सांगितलेली आहे. त्या दृष्टीने 'सार्थ मनोबोध' ग्रंथातील एकेक श्लोक व त्याचा अर्थ बारकाईने जाणून घ्यावा. त्यावर स्वतःचे चिंतन मनन करावे. >> मनाची शांतता, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी लहानथोर सर्वांनी रोज मनोबोध म्हणावा किंवा ऐकावा. गर्भवती महिला, अर्भके, शिशु, बालकुमार मुले-मुली, तसेच सर्व पालक आणि शिक्षकांनी रोज स्नान करताना, भोजन करताना, व्यायाम करताना किंवा प्रवास करताना मनोबोध आवर्जून ऐकावा. त्यावर चिंतन आणि मनन करावे. >> यामध्ये सुरुवातीला 'मनोबोध' ग्रंथाची पार्श्वभूमी सांगितली आहे. त्यानंतर पुढील ७ भागांत प्रत्येक श्लोकाचे पठण व निरूपण केले आहे. शेवटी मूळ श्लोकबद्ध मनोबोध ग्रंथाचे सलग पठण नित्य श्रवण व पाठांतर यासाठी दिले आहे. >> चला तर मग! या सार्थ मनोबोधाचे मनोभावे, एकाग्र व प्रसन्न चित्ताने श्रवण सुरू करूया! >> ऐकताय ना? ऐकत रहा! >> सार्थ मनोबोध | श्रवण मालिका >>>

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹३९९.००

Share

bottom of page