About
यश मिळवण्यासाठी आपल्या विचारांची शक्ती कशी ओळखायची आणि कशी विकसित करायची यासाठी स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेली व शिकवलेली सूत्रे त्यांच्याच शब्दात... >> मनुष्याला निष्क्रिय करणाऱ्या तमोगुणाचा नाश करून त्याला ध्येयाभिमुख करावे व ‘आत्मनो मोक्षार्थम् जगद् हिताय च’ हा आदर्श समोर ठेऊन सर्वांनी आत्माज्ञान नि लोकहित ही दोन्ही साधावी असे स्वामीजींना अगदी हृदयापासून वाटत असे आणि हीच शिकवण त्यांनी आपल्या व्याख्यानांतून दिली आहे. त्यांचे स्वतःचे जीवन म्हणजे ह्या ध्येयप्राप्तीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे; म्हणून त्यांच्या शब्दांत, वाणीत अपार शक्ती साठलेली आहे. >> ‘विचार शक्ती’ या विशेष प्रवचन मालिकेतील स्वामी विवेकानंद यांची दिव्य नि ओजस्वी वाणी वाचक व श्रोत्यांना निरंतर मार्गदर्शक ठरेल. जेव्हा जेव्हा मनात निराशा दाटून येईल, इच्छित ध्येयप्राप्तीत अडचणी येतील, हतबलता वाटेल त्यावेळी स्वामी विवेकानदांची ही वाणी आपल्या सकारात्मक विचार शक्तीला प्रेरित करेल. >> पुन्हा पुन्हा ऐकावीत आणि आपल्या चिंतनात सदैव असावीत अशी ही सर्व प्रवचन मालिका आहे. >> यामध्ये पुढील विषयांना अनुसरून एकूण १७ प्रवचने आहेत. >> विश्वास आणि शक्ती प्रेम आणि निस्वार्थीपणा ईश्वर आणि धर्म स्वदेश आणि स्वराष्ट्र कर्माचे रहस्य >> चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा! >> Press <Join> to purchase and get lifetime access to this audiobook. On Payment page select Manual Payment and input your email id and proceed. >> Press <View> if you have already purchased. Log in and Listen! >> Happy Listening!
You can also join this program via the mobile app. Go to the app