top of page
तुकाराम | अभंग चरित्र | Audiobook

तुकाराम | अभंग चरित्र | Audiobook

तुकाराम | अभंग चरित्र | Audiobook

 

मराठी भाषेचा मानबिंदू म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा. एक सामान्य माणूस ते जगद्गुरु संत असा असामान्य जीवनप्रवास तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष जगून दाखवला. प्रपंचात राहून परमार्थ कसा साधावा, सदाचारी जीवन कसे जगावे याबाबतचा उपदेश तुकाराम महाराजांनी लोकभाषेतून लोककाव्य अभंगातून लिहून, गाऊन प्रत्यक्ष तळागाळात फिरून पोहोचवला. नैतिकता हा तुकाराम महाराजांच्या आयुष्याचा पाया आणि लोकप्रेम हा गाभा. त्यामुळे तुकारामांची वाणी गेली शेकडो वर्षे जनसामान्य आणि पंडित विद्वान यांच्या तोंडी सुभाषितांप्रमाणे रूढ झाली आहे.

 

प्रपंच, विरक्ती, वैराग्य, नैतिकता, कवित्व आणि संतत्त्व असे तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील टप्पे त्यांच्याच अभंगातून उलगडताना प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या आयुष्यातील कडू-गोड प्रसंगांना सामोरे जाण्याची नवी जीवनदृष्टी मिळेल. त्याचप्रमाणे एक कवी म्हणून तुकाराम महाराजांची महती नेमकी काय आणि कशामुळे आहे याचीही प्रचिती आपल्याला मिळेल. मराठी भाषेची पूर्वपीठिका, मराठी साहित्य परंपरेतील तुकाराम महाराजांचे स्थान आणि आधुनिक जीवनात त्यांच्या अभंगाचे महत्त्व हे आपल्याला मनोमन पटेल. तुकाराम माणूस म्हणून आणि संत म्हणून समजून घेण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन आचरणात आणण्यासाठी हे अभंग चरित्र आपल्याला नक्कीच प्रेरित करील आणि साहाय्यक होईल. 

 

या ऑडिओबुकमध्ये तुकाराम महाराजांचा सामान्य ते असामान्य असा जीवन प्रवास त्यांच्याच अभंगांचे गायन, पठण, निरूपण स्वरूपात उलगडून सांगितला आहे. याद्वारे मराठी भाषा आणि मराठी लोकसंस्कृती यांची नव्याने उजळणी होईल.

 

  • यामध्ये एकूण ५ प्रकरणे आहेत. 
  • (एकूण कालावधी : साडेतीन तास)

 

  • Product Details

    AUDIOBOOK.

    • Language: Marathi.
    • Total Set Duration: 3 Hours Approx.
    • Credits: मूळ अभंग लेखन: संत तुकाराम, चरित्र लेखन आणि निरूपण: भालचंद्र नेमाडे
    • अभिवाचन: जी. ए. आडकर
    • पार्श्वसंगीत : जसराजन
    • संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
    • निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
    • ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून
    • Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case / 1 Mp3 Audio USB Card
    • Product Details & Index Card Included in the pack.
    • Free Gift Wrap Available.
  • Retun and Refund Policy

    • We provide free replacement for any kind of defects. 
    • All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.
    • But, We can not offer return or refund facility. 
  • Shipping Info

    Orders will be accepted only from India. 

    Safe & Secure Doorstep Delivery.   

    Shipping Charges Extra.

₹495.00 Regular Price
₹399.00Sale Price