top of page

बहुरूप गांधी | असामान्य चरित्रगोष्टी | Audiobook

  • 29 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

महात्मा गांधीजींचे जीवन हे बहुआयामी होते. जीवनाच्या अनेक क्षेत्रात गांधीजींनी प्रत्यक्ष काम केले, त्यासाठी निरंतर शिक्षण घेतले, अपार कष्ट केले आणि त्यात प्रभुत्वही मिळवले, त्यामध्ये नवीन पद्धतीही आणल्या. >> महात्मा गांधीजींची वयोवृद्ध प्रतिमाच सातत्याने डोळ्यासमोर येते. परंतु गांधीजीची कार्यक्षमता आणि कार्यमग्नता अगदी किशोर अवस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यन्त कायम राहिली. गांधीजींचे आयुष्य म्हणजे सत्य आणि अहिंसा यांच्या जीवन प्रयोगांची निरंतर मालिकाच होय. श्रमप्रतिष्ठा, दीर्घोद्योग, स्त्री-पुरुष समानता व सामाजिक समता ही त्यांच्या जीवन व्यवहारातील प्रमुख सूत्रे राहिली आहेत. >> गांधीजींच्या जीवनातील अनेक अपरिचित पैलूंची माहिती या ऑडिओबुकच्या माध्यमातून करून घेता येईल. कोणतेही काम हलके नसते आणि आपण जे काही काम करू त्यात प्रभुत्व मिळवले पाहिजे, हा प्रमुख मूल्यसंस्कार प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात केला पाहिजे. गांधीजींच्या या श्रमप्रतिष्ठेच्या गोष्टींतून हा संस्कार रुजवणे सहजसाध्य होईल. >> या ऑडिओबुकमध्ये बॅरिस्टर, शिक्षक, पत्रकार, स्वयंपाकी, भंगी, चांभार, सुतार, शिंपी अशा अनेक रूपातील गांधीजींची ओळख आपल्याला होईल. >> विद्यार्थी, युवा, प्रौढ अशा सर्व वयोगटातील सर्वांसाठी उद्बोधक, प्रेरक व मार्गदर्शक अशा या असामान्य चरित्रगोष्टी आहेत. >> यामध्ये एकूण २७ प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : ५ तास ५२ मिनिटे)

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹४९९.००

Share

bottom of page