About
भारताचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य संग्राम >> विशेष श्रवण मालिका >> सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी ही पाच भागांची विशेष श्रवण मालिका आहे. आपल्या भारत देशाचा प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्य लढा यांची रंजक उजळणी करण्यासाठी ही विशेष श्रवण मालिका आहे. >> यामध्ये पुढीलप्रमाणे पाच भाग आहेत. १. भारताचा इतिहास : प्राचीन कालखंड २. भारताचा इतिहास : मध्ययुगीन कालखंड ३. भारताचा इतिहास : अर्वाचीन कालखंड ४. भारतीय स्वातंत्र्य संग्राम : भाग १ ५. भारतीय स्वातंत्र्य संग्राम : भाग २ या श्रवण मालिकेमध्ये पहिल्या तीन भागात भारतीय इतिहासाचा प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन कालखंड यांचा थोडक्यातv रंजक परिचय करून दिलेला आहे. यामध्ये विशाल भारताची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडण विविध राजवटी, विचार आणि धर्मप्रवाह, विविध दर्शने, तत्त्वज्ञान, धार्मिकता यांची उजळणी होईल. त्याचप्रमाणे प्राचीन काळातील शक, हुण, कुशाण किंवा ग्रीक आक्रमणे, मध्ययुगातील इस्लामी आक्रमणे आणि राजवटी तसेच अर्वाचीन काळातील युरोपियन आक्रमणे यांचा इतिहास जाणून घेता येईल. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य संग्राम ही प्रा. ग. प्र. प्रधान यानी सांगितलेली भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ओघवती आणि विस्तृत अशी दोन भागांची मालिका आहे. यामध्ये सुरुवातीला भारतावरील विविध युरोपियन राष्ट्रांची आक्रमणे ही आधीच्या आक्रमणांपेक्षा कशी वेगळी होती आणि त्यांचा भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक व्यवहारांवर कसा आमूलाग्र बदल झाला याचा आढावा घेतला आहे. त्यानंतर १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची पार्श्वभूमी आणि कहाणी कथन केली आहे. या उठावाच्या अपयशानंतर भारतातील समाज धुरीणांनी भारतीय समाजात आंतरिक सामाजिक सुधारणा, राजकीय सुधारणा आणि त्यासाठी लोकशिक्षण व लोकजागृती यांवर भर देत एका आधुनिक, स्वतंत्र, सर्वाभौम लोकशाही भारताची राष्ट्रीय जडणघडण कशी केली, त्यासाठी कसा संघर्ष केला त्याची सविस्तर कहाणी सांगितली आहे. यामध्ये सर्व समाज सुधारक, जहाल, मवाळ राजकीय प्रवाह, सशस्त्र व नि:शस्त्र अशा सर्व प्रकारच्या प्रवाहांची कहाणी सांगितली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजचे स्वतंत्र भारतीय प्रजासत्ताक कसे अस्तित्वात आले यांचा नव्या-जुन्या प्रत्येक पिढीसाठी उद्बोधक असा हा इतिहास आहे.
You can also join this program via the mobile app. Go to the app