About
दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान! >> 'चार्वाक दर्शन' ही एक जीवनदृष्टी आहे. जीवन सम्यक रीतीने जगण्याची एक विज्ञाननिष्ठ पद्धत आहे. या प्राचीन भारतीय दर्शनानुसार जीवन ही एक वस्तुस्थिती आहे, स्वप्न वा भ्रम नव्हे. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणाने त्यांना सामोरे जायचे असते. त्यांच्यापासून दूर पळायचे नसते. म्हणून जीवनाच्या विविध अंगांचा विचार करताना चार्वाक दर्शनाने खोटी प्रतिष्ठा, दुटप्पीपणा इत्यादिना थारा न देता प्रत्येक वेळी वास्तववादी, जीवनवादी भूमिका स्वीकारली. >> मानवी शरीर एकदा नष्ट झाले की, पुन्हा प्राप्त होत नसते; म्हणूनच प्राप्त झालेल्या शरीराचा शहाणपणाने जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. आपण जगण्यासाठी जन्माला आलो आहोत, मरण्यासाठी नव्हे. मृत्यू अटळ असेल, परंतु म्हणून काही तो जीवनाचा उद्देश ठरू शकत नाही. जगणे आणि आनंदाने जगणे हाच जीवनाचा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी पारलौकिक वा कल्पित अशा अतिमानवी शक्तींचा आश्रय घेण्याची गरज नाही. मानवनिर्मित आणि विवेकाधिष्ठित समाजव्यवस्था या उद्देशाची पूर्ती करू शकेल. >> चार्वाक दर्शन हे असे आहे – वास्तववादी, जीवनवादी, मानववादी! >> त्याचीच ही एकूण १० प्रकरणांची विशेष परिचय श्रवण मालिका.
You can also join this program via the mobile app. Go to the app