top of page

कबीर | काळ, कार्य, वचन | चरित्र अभ्यास

  • 10 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

संत कबीर यांचे दोहे, वचन आणि कार्य यांचा भारताच्या इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, लोकसंस्कृती आणि लोकजीवन यांवर खोलवर प्रभाव पडलेला आहे. >> "कबीरा खडा बजार में, मांगे सबकी खैर | ना काहू से दोस्ती ना काहू से बैर|" असा स्पष्ट जीवन आशय व्यक्त करणारी कबीर वाणी, वचने संत तुकाराम महाराज यांच्या वाणी व वचनांप्रमाणेच सामान्य माणूस ते विद्वान अशा सर्वांच्या तोंडी रुळलेली दिसतात. >> आजच्या धार्मिक कलहाच्या काळात विशेषतः तरुण पिढीला संत कबीर यांचे चरित्र व त्यांचा उपदेश यांचा अभ्यास करणे अत्यंत मार्गदर्शक ठरेल. >> काल, कार्य, वचन या तीन टप्प्यात कबीर चरित्राचा विस्तृत स्वरूपात परिचय या ऑडिओबुकच्या माध्यमातून करून दिलेला आहे. संत कबीर यांचे उपलब्ध साहित्य, त्यांच्यावरील ग्रंथ, मौखिक कथा, दंतकथा, ऐतिहासिक गोष्टी, समकालीन बखरी इत्यादींचा आढावा घेत संत कबीर यांचे चरित्र उलगडून सांगितले आहे. >> प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एकाच वेळी करणे शक्य आहे. विविध धर्म आणि पंथ हे एकाच देहावरील अनेक पेहराव किंवा पोशाख यांच्यासारखे आहेत. देह सलामत तर पोशाख अनेक! पोशाख अनेक पण देह मुळात एकच! असे हे भक्त आणि भगवंत यांचे ऐक्य आहे. असेच हे माणसा माणसातील नाते आहे. ही संत कबीर यांची शिकवण आहे. >> संत कबीर यांनी भक्तीमार्ग, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग हे तिन्ही मार्ग सांगितले व स्वतः आचरण केले. परंतु त्यांनी सर्वात महत्त्वाचा मार्ग सांगितला तो म्हणजे 'प्रेम मार्ग'. प्रत्येक माणसाला, समूहाला किंवा राष्ट्राला आचरण करण्यासाठी सर्वात आवश्यक मार्ग म्हणजे प्रेम मार्ग हाच होय असे संत कबीर सांगतात. या प्रेम मार्गातूनच मग भक्ती, कर्म आणि ज्ञान हे इतर सर्व मार्ग खुले होतात. त्यामुळे माणसाने नित्य सुमिरन (श्रवण, मनन, चिंतन) करावे आणि प्रेम मार्गाचा गुह्य अर्थ जाणून घेत आचरण करावे. >> यासाठी संत कबीर यांची काव्यरचना आपल्याला निरंतर पठण करण्यासाठी, गाण्यासाठी आणि अर्थ जाणून आचरणात आणण्यासाठी स्वयंसिद्ध आहे. या ऑडिओबुक मध्ये संत कबीर यांच्या मूळ भाषेतील अनेक निवडक रचना अर्थासहित स्पष्ट करून सांगितल्या आहेत. >> संत कबीर यांच्या चरित्र अभ्यासातून उत्तम चारित्र्याकडे वाटचाल घडवण्यास ही विशेष श्रवण मालिका सर्वांना प्रेरक ठरेल. >> यामध्ये एकूण ९ प्रकरणे आहेत. एकूण कालावधी सुमारे ३ तास.

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹४९९.००

Share

bottom of page