About
जोतिराव गोविंदराव फुले | चरित्र अभ्यास | Audiobook >> विशेष श्रवण मालिका >> भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक सुधारणांचे अग्रणी व आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा जोतिबा फुले यांचे जीवन आणि कार्य निरंतर प्रेरणादायी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, बहुजन समाजासाठी शिक्षणाची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आणि देशात ब्रिटिशांची परकी राजवट असताना स्वतः शिकून, पत्नीला शिकवून स्त्रीशिक्षण, अस्पृश्य शिक्षण, विधवा पुनर्विवाह, महिलाश्रम, अनाथाश्रम, उद्योग-व्यवसाय इत्यादि सर्वच क्षेत्रात नव-प्रवर्तक स्वरूपाचे कार्य जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले. त्यांच्या निस्वार्थ, त्यागमय निरंतर कार्यामुळे आणि त्यांच्या सत्यनिष्ठ जीवन दर्शनामुळे लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी मोठ्या प्रेमाने व आदराने सन्मानपूर्वक बहाल केली. >> आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा विचार महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपूही शकत नाही. म्हणूनच महात्मा फुले यांचे सहकारी सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी लिहिलेले हे आद्य चरित्र ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. >> यामध्ये एकूण तीन भाग आणि २२ प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : ४ तास ४३ मिनिटे)
You can also join this program via the mobile app. Go to the app