About
प्रत्येक मराठी कुटुंबातील जुन्या व नव्या पिढीतील प्रत्येकाला एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे ऐकून अनुभवण्यासाठी ही ५ ऑडिओबुकची विशेष श्रवण मालिका आहे. >> भारतीय संत परंपरेची व ज्ञानाची मूलभूत ओळख करून देणाऱ्या ५ ऑडिओ ग्रंथांची ही विशेष मालिका आहे. संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत तुकाराम, संत कबीर आणि गुरु नानक ही भारतीय संत परंपरेतील विविध संप्रदायातील थोर विभूती आहेत. या पाच संतांना आणि त्यांच्या चरित्र व वचनाना जाणून घेण्यासाठी ही पाच ऑडिओबुकची विशेष श्रवण मालिका आहे. >> यामध्ये पुढील ५ ऑडिओबुक आहेत - १. सार्थ संस्कार ज्ञानेश्वरी | विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी (ज्ञानेश्वरी या ज्ञानग्रंथाच्या प्रत्येक १८ अध्यायांचे सार सांगणाऱ्या निवडक ओव्या गायन व पठण स्वरूपात आणि त्या ओव्यांचा सरळ सुलभ भावार्थ निरूपण.) २. सार्थ मनोबोध | भावार्थासहित २०५ मनाचे श्लोक (मनाचा मनाशी संवाद घडवून मनाला आत्मबोध, ज्ञानबोध, नीतीबोध आणि व्यवहारबोध करून देणारे २०५ मनाचे श्लोक अर्थात मनोबोध ग्रंथांचे संपूर्ण पठण व भावार्थ निरूपण) ३. तुकाराम | अभंग चरित्र (संत तुकाराम महाराज यांचा एक सर्वसामान्य माणूस ते जगद्गुरु संत असा जीवनप्रवास त्यांच्याच अभंगातून उलगडून सांगणारी ही सुमारे तीन तासांची विशेष श्रवण मालिका) ४. कबीर | काळ, कार्य, वचन (संत कबीर यांचे जीवन चरित्र आणि त्यांचे निवडक दोहे व त्यांचा भावार्थ) ५. गुरु नानक (शिखांचे प्रथम गुरु नानकदेव यांचे जीवन चरित्र, त्यांचे तत्त्वज्ञान, वाणी आणि त्यांचा भारतीय जीवनावरील प्रभाव समजावून सांगणारी सुमारे ४+ तासांची विशेष श्रवण मालिका) >> एकूण कालावधी : सुमारे १५ तास >>
You can also join this program via the mobile app. Go to the app