top of page

मूलभूत व्यक्तिमत्त्व विकास | A Unique Series of 5 Audiobooks

  • 86 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

'व्यक्तिमत्त्व विकास' (Personality Development) हा आजच्या युगातील जीवनाचा कळीचा मुद्दा आहे. या विषयावर हजारो रुपयांच्या शेकडो कार्यशाळा घडत आहेत. >> स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही जागतिक इतिहासातील प्रभावी ठरलेली व्यक्तिमत्त्वे आहेत. किशोरवयीन, प्रौढवयीन अशा सर्वांसाठी 'व्यक्तिमत्त्व विकास या विषयाचा मूलभूत (Foundational) अभ्यास करण्यासाठी या तिघांच्या लिखित विचारधनातून साकारलेली ही ५ ऑडिओबुकची विशेष श्रवण मालिका आहे. . >> मानवी व्यक्तिमत्त्व विकासाचे तीन प्रमुख स्तर म्हणजे - आत्मिक | नैतिक | ऐहिक हे तीन स्तर समजून घेण्यासाठी पहिली तीन ऑडिओबुक आहेत. त्यानंतर व्यक्तिमत्त्व विकास कशासाठी करायचा व कसा करायचा यासाठी पुढील दोन ऑडिओबुक आहेत. >> यामध्ये पुढील क्रमाने ५ ऑडिओबुक आहेत. >> १. व्यक्तिमत्त्व विकास | आत्मिक | स्वामी विवेकानंद (व्यक्तिमत्त्व म्हणजे काय? व्यक्तिमत्त्व विकासाचा नियम काय, सूत्र काय याबाबत स्वामी विवेकानंद यांची पुन्हापुन्हा ऐकावी अशी २५ भागांची विचारमाला) >> २. व्यक्तिमत्त्व विकास | नैतिक | महात्मा गांधी (भारतीय दर्शन परंपरेत सांगितलेली आणि आधुनिक काळात आवश्यक असलेली व्यक्तिमत्त्व विकासाची ११ सूत्रे शिकवणारी महात्मा गांधी यांची 'मंगल प्रभात' विचारमाला) >> ३. व्यक्तिमत्त्व विकास | ऐहिक (सामाजिक, राजकीय, आर्थिक ) | डॉ. बाबासाहेब आंबेडकर (व्यक्तिमत्त्व विकासाचे ऐहिक आयाम, सामाजिक-राजकीय-आर्थिक दृष्टीने व्यक्तिमत्त्व विकासाची दिशा, व्यक्ती-समाज-राष्ट्र आणि व्यक्तिमत्त्व विकास, लोकशाही आणि व्यक्तिमत्त्व विकास इत्यादि दृष्टीने अत्यंत अमूल्य असे विचारधन देणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातील निवडक अवतरणातून साकारलेली इंग्रजी व मराठीतील ही विशेष सुविचारमाला आहे.) >> ४. यश रहस्य | The Secret of Success | स्वामी विवेकानंद (यश म्हणजे नेमके काय, कशासाठी, यश मिळवण्याची सूत्रे काय हे अत्यंत सोप्या शब्दात प्रभावीपणे शिकवणारी स्वामी विवेकानंद यांची विशेष विचारमाला.) >> ५. विचार शक्ती | The Power of Thinking | स्वामी विवेकानंद (यश मिळवण्यासाठी आपल्याच विचारांची शक्ती कशी मिळवावी आणि या विचारशक्तीचा उपयोग कसा करावा व कशासाठी करावा हे शिकवणारी स्वामी विवेकानंद यांची विशेष विचारमाला आहे)

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹२,३९९.००

Share

bottom of page