About
प्रबोधन | चरित्र अभ्यास मालिका >> A Unique Series of 5 Audiobooks >> विषय प्रवेश : भगवान बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्तीनामे नसून प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. माणसा - माणसातील संबंध अधिक माणुसकीचे व्हावेत, अलौकिक जगापेक्षा लौकिक जगात प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता यावे, धार्मिक-सामाजिक-राजकीय-आर्थिक इत्यादि सर्व प्रकारचे अन्याय आणि भेदभाव नष्ट व्हावेत यासाठी तत्त्वज्ञान आणि कृती या दोन्हीने जगाला दर युगात एक नवी आणि योग्य दिशा दाखवण्याचे काम या प्रबोधन परांपरेने केले आहे. >> ही प्रबोधन परंपरा भूतकाळात जितकी महत्त्वाची होती तितकीच ती आजही महत्त्वाची आहे आणि भविष्यातही तितकीच महत्त्वाची राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिल्याप्रमाणे क्रांती-प्रतिक्रांतीचा झगडा हा शतकानुशतके चालूच आहे. प्रत्येक शतकात प्रत्येक पिढीला तो जागरूकपणे लढावाच लागतो. दुःखित, शोषित, पीडित वर्गाला आत्मभान देणे आणि शोषक वर्गाला त्यांच्या अन्यायाची जाणीव करून देऊन त्याचा जाब विचारून अन्याय्य व्यवस्था बदलणे यासाठी शोषक आणि शोषित या दोघांचेही प्रबोधन आवश्यक असते. >> या विशेष श्रवण मालिकेमध्ये बुद्ध - कबीर - फुले - शाहू - आंबेडकर ही प्रबोधनाची परंपरा या पाच चरित्रांतून उलगडून सांगितली आहे. ही सर्व दीर्घ चरित्रे आहेत. या मालिकेचा एकूण कालावधी सुमारे १५ तास आहे. >> विद्यार्थी, शिक्षक, पालक इत्यादि सर्वांनीच आवर्जून ऐकावी अशी ही विशेष श्रवण मालिका आहे. यामध्ये पुढील श्रवण अनुक्रम आहे. १ | सिद्धार्थ गौतम | चरित्र ओळख २ | कबीर | काळ, कार्य, वचन | चरित्र अभ्यास ३ | महात्मा जोतिराव गोविंदराव फुले | चरित्र अभ्यास ४ | छत्रपती राजर्षि शाहू महाराज | चरित्र अभ्यास ५ | युगप्रवर्तक डॉ. बाबसहेब आंबेडकर | चरित्र अभ्यास चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा! >>
You can also join this program via the mobile app. Go to the app