About
सावरकर विचार विश्व विचार दर्शन | भूमिका | आत्मकथन समग्र सावरकर | श्रवण मालिका | हंगाम पहिला | A Unique Set of 5 Audiobooks भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे राजकीय व सामाजिक नेते, वक्ते, लेखक, कवी, क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांचे 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र, ‘हिंदुत्व : व्याख्या आणि भूमिका’ हा संपूर्ण वैचारिक ग्रंथ आणि इतिहास, धर्म, समाज, संस्कृती, राजकारण, संरक्षण, भाषा, लिपी, साहित्य, कला, आरोग्य इत्यादि विविध विषयांवरील ४२ पुस्तकांतील १० सूत्रबद्ध भागांतील वैचारिक लेखनाचे ३ खंड अशी सावरकरांच्या वैचारिक लेखनाची एकूण ५ खंडांची आणि ९२ भागांची ही विशेष श्रवणमालिका आहे. आजच्या पिढीतील युवांना सावरकरांची भाषा वाचायला थोडी कठीण वाटते पण ऐकून आत्मसात करणे सर्वांनाच सहज शक्य आहे. सावरकरांचे जीवन, विचार, भूमिका आणि कार्य त्यांच्याच शब्दांत सूत्रबद्ध स्वरूपात सावरकरांच्याच मूळ भाषेत क्रमाक्रमाने जाणून घेण्यासाठी 'सावरकर विचार विश्व' ही विशेष श्रवण महामालिका आहे. 'सावरकर विचार विश्व' या ऑनलाईन श्रवण महामालिकेत सावरकरांचे समग्र वैचारिक साहित्य घरी, कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासात एकट्याने किंवा समूहाने स्वतःच्या सोयीने, सवडीने व आवडीने कोणत्याही क्रमाने कितीही वेळा ऐकता येईल. आपले ऐकून पूर्ण झालेले भाग किंवा ऐकायचे राहिलेले भाग नव्याने समाविष्ट झालेले भाग, आगामी भाग याविषयी आपल्याला वेळोवेळी स्मरण संदेश मिळेल. एकूण कालावधी : सुमारे २१ तास चला तर मग... ऐकताय ना? ... ऐकत रहा! 'सावरकर विचार विश्व'
You can also join this program via the mobile app. Go to the app

