top of page

श्री देवी उपासना | A Unique Series of 5 Audiobooks

  • 58 Steps

About

श्री देवी उपासना “श्री देवी उपासना” ही नवरात्र काळासह संपूर्ण वर्षभर नित्य व नैमित्तिक श्रवण, पठण आणि उपासनेसाठी उपयुक्त अशी ५ विशेष ऑडिओबुक्सची भक्तिमय श्रवणमालिका आहे. देवी तत्त्व, स्वरूप, पूजाविधी, मंत्र-स्तोत्रे, दुर्गा सप्तशती, अथर्वशीर्ष आणि ध्यान यांचा सुंदर समन्वय या मालिकेत करण्यात आला आहे. वैयक्तिक साधनेसह संपूर्ण कुटुंबासाठी ही श्रवणमालिका उपयुक्त आहे. १. घटस्थापना : देवी तत्त्व, स्वरूपबोध व पूजाविधी घटस्थापनेमागील देवी तत्त्व, देवीचे स्वरूप आणि नवरात्रातील पूजाविधी समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ऑडिओबुक. २. संपूर्ण देवी उपासना वर्षभर दैनंदिन श्रवणासाठी आवश्यक स्तोत्रे, मंत्र, आरती व पाठ यांचा संस्कृत व मराठी माध्यमातून संग्रह. ३. सार्थ श्री दुर्गा सप्तशती देवी उपासनेतील प्रमुख ग्रंथ श्री दुर्गा सप्तशतीचे मूळ संस्कृत पठण व मराठी भावार्थासहित सादरीकरण. नवरात्रातील पारायण व श्रवणासाठी विशेष उपयुक्त. ४. सार्थ पंच अथर्वशीर्ष श्री गणेश, देवी, सूर्य, नारायण आणि शिव या पंचायतन देवतांची संपूर्ण अथर्वशीर्षे, मूळ संस्कृत संगीतमय पठण व मराठी भावार्थासहित. ५. देवी ध्यान देवी, दुर्गा, महालक्ष्मी, सरस्वती आणि तुळजाभवानी या प्रमुख शक्तीदेवतांच्या बीजमंत्रांच्या १०८ जपमाला. ध्यान, जप तसेच दैनंदिन कामे, प्रवास किंवा विश्रांतीच्या वेळी भक्तिमय श्रवणासाठी उपयुक्त. नवरात्रातील उपासनेपासून वर्षभराच्या दैनंदिन साधनेपर्यंत, “श्री देवी उपासना” ही देवीभक्तीचे विविध पैलू एका सुंदर श्रवणरूपात एकत्र आणणारी विशेष मालिका आहे. श्री देवी उपासना — श्रवणातून देवी तत्त्व जाणून घ्या, मंत्र-स्तोत्रांतून उपासना करा आणि ध्यानातून अंतर्मनाशी जोडा.

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹२,३९९.००

Share

bottom of page