About
स्वामी विवेकानंदांचे जीवन चरित्र आणि त्यांचे विचार हे सर्व पिढ्यांना निरंतर मार्गदर्शक आहेत. परंतु स्वामी विवेकानंदांचे साहित्य इतके विपुल आहे की त्यातील नेमके काय आणि कुठल्या क्रमाने वाचावे असा प्रश्न पडू शकतो. म्हणूनच लहानथोर सर्वांसाठी ही विशेष श्रवण मालिका निर्मित केली आहे. ज्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचले आहे त्यांच्यासाठी ही श्रवण मालिका म्हणजे उत्तम उजळणी होईल. ज्यांनी स्वामी विवेकानंदांचे मूळ साहित्य विशेष वाचले नाही किंवा ज्यांना वाचनाची विशेष गोडी नाही त्यांच्यासाठी ही विशेष श्रवण मालिका संजीवनीचे काम करेल. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही श्रवण मालिका आहे. या श्रवण मालिकेच्या माध्यमातून आपण स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांचे विस्तृत चरित्र आणि जीवन उपदेश अभ्यासू शकतो. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांच्या भारतातील आणि भारता बाहेरील निवडक भाषणांतील अत्यंत महत्त्वाचे संपादित अंश 'स्वामी विवेकानंद विचार दर्शन' या मालिकेच्या ३ खंडांत ऐकू शकतो. प्रत्येकी साधारण १० मिनिटांचे एकूण ७२ एपिसोड असलेली ही ३ खंडांची श्रवण मालिका आहे. स्वामी विवेकानंद जीवन विचार दर्शन या श्रवण मालिकेत पुढील ५ ऑडिओबुक आहेत. १. स्वामी विवेकानंद | चरित्र आणि उपदेश | (कालावधी सुमारे ४ तास) २. श्रीरामकृष्ण परमहंस | चरित्र आणि उपदेश (कालावधी सुमारे ४ तास) ३. स्वामी विवेकानंद | विचार दर्शन | निवडक व्याख्याने | भाग १ (२३ प्रवचने) | (कालावधी सुमारे ४ तास) ४. स्वामी विवेकानंद | विचार दर्शन | निवडक व्याख्याने | भाग २ (२८ प्रवचने) | (कालावधी सुमारे ४ तास) ५. स्वामी विवेकानंद | विचार दर्शन | निवडक व्याख्याने | भाग ३ (२१ प्रवचने) | (कालावधी सुमारे ४ तास) >> चला तर मग! Purchase this online streaming series of 5 Audiobooks and get lifetime access. ऐकताय ना? ऐकत रहा!
You can also join this program via the mobile app. Go to the app