About
थोर संगीतकारांची परंपरा | विशेष चरित्र मालिका >> हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची समृद्ध व महान परंपरा उलगडून सांगणारी मध्ययुगीन तानसेन पासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यन्तच्या प्रमुख थोर शास्त्रीय गायक, वादक आणि श्रेष्ठ गुरूंची चरित्र ओळख, संगीत साधना, शैली, कार्य यांचा परिचय करून देणारी ज्येष्ठ संगीत गुरु बी. आर. देवधर यांच्या लेखणीतून साकारलेली पाच भागांची ही विशेष श्रवण मालिका आहे. यामध्ये एकूण २९ विशेष चरित्र कथने आहेत. >> हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा आत्म्याचे परमात्म्याशी मीलन घडवणारा साधनामार्ग मानला गेला आहे. गुरु-शिष्य परंपरेतून गुरुकुल किंवा संगीत घराणी यांच्या माध्यमातून ही संगीत विद्या पिढ्यानपिढ्या विकसित आणि समृद्ध होऊन गेली आहे. या गुरु-शिष्य परंपरेमध्ये संगीताच्या ध्यासामुळे धार्मिक व जातीय बंधनेही गळून गेल्याचे दिसते. त्याचप्रमाणे संगीत साधना म्हणजे नेमके काय, रियाज कसा करावा, संगीत साधनेची तपश्चर्या म्हणजे काय?, शास्त्रीय संगीत कसे निर्माण झाले? इत्यादि अनेक विषयांचा उद्बोधक परिचय होईल. संगीत साधना करणारे विद्यार्थी, शिक्षक तसेच रसिक श्रोते अशा सर्वांना ही श्रवण मालिका उपयुक्त आणि उद्बोधक आहे. >> चला तर मग! ऐकायला सुरुवात करुयात! ऐकताय ना? ऐकत रहा!
You can also join this program via the mobile app. Go to the app