About
तुकाराम | अभंग चरित्र >> श्रवण मालिका >> मराठी भाषेचा आणि लोकसंस्कृतीचा मानबिंदू म्हणजे तुकाराम महाराजांची जीवन-गाथा. एक सामान्य माणूस ‘तुकाराम’ ते ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज’ असा असामान्य जीवनप्रवास तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष जगून दाखवला. >> प्रपंचात राहून परमार्थ कसा साधावा, सदाचारी जीवन कसे जगावे याबाबतचा उपदेश तुकाराम महाराजांनी लोकभाषेतून लोककाव्य अभंगातून लिहून, गाऊन प्रत्यक्ष तळागाळात फिरून पोहोचवला. नैतिकता हा तुकाराम महाराजांच्या आयुष्याचा पाया आणि लोकप्रेम हा गाभा. त्यामुळे तुकारामांची वाणी गेली शेकडो वर्षे जनसामान्य आणि पंडित विद्वान यांच्या तोंडी सुभाषितांप्रमाणे रूढ झाली आहे. >> तुकाराम गाथेतून घडणारे तुकारामाचे दर्शन हे प्रत्येक माणसाला एक सखा, मित्र, मार्गदर्शक, कुटुंबातील-समाजातील एक वडीलधारा माणूस आणि संत, सद्गुरू अशा रूपात आश्वस्त करणारे आहे. ‘तुकाराम वाणी’ ही जीवन उजळून टाकणारी वाणी आहे. ‘तुकाराम चरित्र’ हे ‘अभंग चरित्र’ आहे. म्हणूनच या श्रवण मालिकेत सख्यभावाने ‘तुकाराम’ या प्रीतीपूर्वक आदरयुक्त एकेरी संबोधनाने हे अभंग चरित्र कथन केले आहे. >> तुकाराम महाराजांचा काळ, त्यावेळची सामाजिक राजकीय आर्थिक स्थिती, त्यावेळच्या सामाजिक धारणा, तुकारामाचे जीवन, संत तुकाराम महाराज यांचे कार्य, त्यांची अभंगवचने, तुकाराम वाणीचा भावार्थ आणि निरूपण निरूपण इत्यादि अनेक गोष्टी या अभंग चरित्रातून जाणून घेता येतील. >> या श्रवण मालिकेमध्ये तुकाराम महाराजांचा 'सर्वसामान्य ते असामान्य-अलौकिक' जीवन प्रवास त्यांच्याच अभंगांचे गायन, पठण, निरूपण स्वरूपात उलगडून सांगितला आहे. याद्वारे मराठी भाषा आणि मराठी लोकसंस्कृती यांची नव्याने उजळणी होईल. >> यामध्ये एकूण ८ भाग आहेत.
You can also join this program via the mobile app. Go to the app