About
व्यक्तिमत्त्व विकास | आत्मिक | स्वामी विवेकानंद >> श्रवण मालिका | Audiobook >> स्वरूप : ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर आज शेकडो कार्यशाळा घेतल्या जात आहेत. शेकडो पुस्तके निघत आहेत. मात्र अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दांत स्वामी विवेकानंदांनी व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, ते कसे घडवायचे आणि आपल्याच आयुष्याचे आपणच शिल्पकार कसे व्हायचे हे शिकवले. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयाचे हे धडे प्रत्येक विद्यार्थी, पालक व शिक्षकाने पुन्हापुन्हा गिरवले पाहिजेत. >> बाल-किशोर वयापासून ते वृद्धापर्यन्त कोणत्याही वयाच्या, लिंगाच्या किंवा कोणत्याही शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक पार्श्वभूमीच्या कोणत्याही व्यक्तीला आजन्म मार्गदर्शक ठरतील अशी ही व्यक्तिमत्त्व विकासाची मूलभूत सूत्रे आहेत. स्वामी विवेकानंदांच्या आश्वासक आणि निरंतर प्रेरक वाणीत आपला जीवनविषयक दृष्टिकोण नव्याने तपासत आपलेही व्यक्तिमत्त्व उजळून टाकण्याची क्षमता आहे. >> व्यक्तिमत्त्व विकास या विषयाचे हे मूलभूत धडे पुढील आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर उपयुक्त ठरणार आहेत. व्यक्तिमत्त्व विकासाच्या या मूलभूत सूत्रांचे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पुनःपुनः नियमित श्रवण, मनन, चिंतन व आचरण करण्यासाठी ही विशेष श्रवण मालिका अत्यंत उपयुक्त आहे. >> या श्रवण मालिकेत एकूण २५ प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी २ तास ३७ मिनिटे) >> चला तर मग! ऐकायला सुरुवात करूया! ऐकताय ना? ऐकत रहा! >> Press <Join> to purchase and get lifetime access to this audiobook. Press <View> if you have already purchased. Log in and Listen! >> Happy Listening!
You can also join this program via the mobile app. Go to the app