top of page
Search

Back to Basics | वाङमय गप्पा


नमस्कार मंडळी,

#पुस्तकवाणी_वाङमय_गप्पा सदरामध्ये

आपले स्वागत आहे.


#मुळांकडे_जाऊ अर्थात '#Back_to_Basics

ही आपली आजची #वाङमय_गप्पा थीम आहे.

याविषयी आपण बेसिक गप्पा करू.


आपण कोण आहोत?

आपण कुठून आलो?

आपण कुठे निघालो?

आपण काय करायला हवे?

आपण काय करतो आहोत?


इत्यादि इत्यादि आपले मुळांचे प्रश्न आहेत.

मूलभूत प्रश्न! पायाभूत प्रश्न!

व्यक्ती, समाज, राष्ट्र वगैरे वगैरे

सगळ्यांनाच हे प्रश्न समान लागू आहेत.


मूलभूत सत्य म्हणून इतकं मान्य करावंच लागतंय की

कोणताही जीव शरीर घेऊन जन्माला आल्यावर

  • जगण्यापासून सुटका नाही

आणि

  • मृत्यूही चुकलेला नाही.


पाच ज्ञानाची इंद्रिये, पाच कर्माची इंद्रिये, पाच अंतःकरणे

यांनी युक्त असा हा सचेतन देहाचा देव्हारा आहे.

त्या देव्हाऱ्याला एक गाभारा आहे.

त्यात गणपती बसलेला आहे. तो म्हणजे प्राण.


प्राण, प्राणवायू, प्राणशक्ती, प्रणव

हीच या देव्हाऱ्याची आदिचेतना.

एकदम बेसिक काय असेल तर ते हेच.

प्राण चुकला की सर्वच हुकला.


थोडक्यात, 'जान है तो जहान है' हाच आपला मूलभूत मंत्र!


"आयुष्याने आयुष्यात आणलं तर आलो.

मरणाने चला म्हटलं तर निघालो.

ना स्वखुशीने आलो

ना स्वखुशीने निघालो"


असा एखाद्याचा आत्म-अनुभव


"आये तब जग हंसा हम रोये

जाये तब हम हंसे जग रोये"


असा एखाद्याचा आत्म-उपदेश


जगण्या-मरण्याचा

बेसिक लसावि-मसावि म्हणजे -

प्राण!

श्वास!

जीवाचा जीव!

जगण्याची जाणीव!


त्यामुळे बेसिक नीड, मूलभूत गरज, मूलभूत हक्क

वगैरे वगैरे गप्पा सुरू झाल्या की

सर्वप्रथम प्राण आठवायचा

जगण्याचा हक्क वठवायचा!


वाचा, वाणी, विचार, कृती वगैरे सगळं नंतर

आधी श्वास घ्यायाचा!

15 views0 comments

Comentários


bottom of page