top of page
विचारांची शाळा | ऑडिओ विशेषांक

विचारांची शाळा | ऑडिओ विशेषांक

SKU: 364215376135191

विचारांची शाळा

ऑडिओ विशेषांक 2020

कुटुंबांसाठी सकस वैचारिक खुराक

 

मित्रहो,

कोरोनावर मात करत असतानाच, कार्यालय-शाळा-कुटुंब-घर एकत्र आलेले असताना,

2020-21 या सर्वार्थाने विशेष वर्षांच्या निमित्ताने सादर करीत आहोत

‘विचारांची शाळा’ ऑडिओ विशेषांक

आपल्याला आणि कुटुंबाला अत्यंत पौष्टिक असा बौद्धिक खुराकदेण्यासाठी,

पूर्वजांच्या सुसंस्कारांचा खुंट हलवून पक्का करण्यासाठी आणि आपल्या विचारांचा बांधा सशक्त करण्यासाठी,

कानाला, मनाला आणि बुद्धीला तृप्त करणारी

११ तासांची वेचक-वेधक श्रवण मेजवानी

दोन खंडांचा आणि वीस भागांचा भरगच्च, व्यापक ऑडिओ विशेषांक

 

या विशेषांकात ऐकायला मिळेल-

 • आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, छत्रपती संभाजी महाराज, श्रीरामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री गोळवलकर गुरुजी, हुतात्मा शहीद भगत सिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भगवान बुद्ध आणि येशू ख्रिस्त यांच्या स्वतःच्या लेखन-वचनांची निवडक ऑडिओ लेखमालिका
 • छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा गांधी यांच्या विशेष चरित्रगोष्टी, आणि-
 • भारतीय लोकरंगभूमीसंगीताचे समाजशास्त्रही विशेष व्याख्याने

 

दोन ऑडिओ सीडीच्या संच स्वरूपात हा विशेषांक आपल्याला सुरक्षितपणे द्वारपोच मिळेल.

यामधील ऑडिओ कंटेंट डीव्हीडी प्लेयर, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅब किंवा युएसबी ड्राइव्ह अशा कोणत्याही माध्यमात घेऊन, आपल्या सोयीनुसार कधीही ऐकता येईल.

त्याचप्रमाणे तुमच्या व्यक्तिगत/कौटुंबिक लायब्ररीत हा ऑडिओ विशेषांक अत्यंत मोलाची भर घालेल.

 

८ तासांच्या या ऑडिओ विशेषांकाचे मूल्य रुपये ७९९/- आहे.

आगाऊ नोंदणीनुसार विशेष २५% सवलतीत हा विशेषांक

केवळ ५९९/- रुपयांत विनामूल्य द्वारपोच मिळेल.

 • More Details

  या विशेष विचारांच्या शाळेतआपण पुढील विषय शिकणार आहोत.

  ही अनुक्रमणिका पाहा आणि ताबडतोब हा सकस वैचारिक खुराक, म्हणजेच हा ऑडिओ विशेषांक आपल्या घरी मागवा.

  खंड 1

  • शिवरायांच्या युद्धकथा : असा पळाला शाहिस्तेखान, आग्र्याचा पुनर्जन्म आणि कंचनमंचनचा खेळ, दक्षिणेतील दूरदृष्टीची कारवाई : (छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीतून साहस, नेतृत्व, प्रसंगावधान, धैर्य, चातुर्य, नियोजन, दूरदृष्टी इत्यादि चारित्र्यगुण शिकण्यासाठी निवडक युद्धकथा) (लेखक : कॅप्टन राजा लिमये)
  • बालकिशोरांसाठी संस्कार ज्ञानेश्वरी : अठरावा अध्याय, सार्थ पसायदान (मराठी भाषेच्या मूलभूत संस्कारांसाठी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील निवडक ओव्या आणि पसायदान यांचे बालकिशोरांसाठी परिणामकारक सहजसुलभ गायन, पठण आणि भावार्थ निरूपण) : (मूळ लेखन: संत ज्ञानेश्वर, भावार्थ आणि निरूपण: शैलजा मुकुंद सबनीस)
  • शंकराचार्य उवाच : भावार्थ वचनामृत : कोsहम् मी कोण आहे?, अविद्या निरूपण, ज्ञान : (सहजसोप्या मराठी भाषेत वैदिक तत्त्वज्ञानाचे सार शिकवणारी आत्मभान, अज्ञान आणि ज्ञान यांविषयीची आदि शंकराचार्य यांची सूत्रबद्ध निवडक अमृत वचने)(मूळ वचने: आद्य शंकराचार्य)
  • सार्थ आत्माराम : ब्रह्म निरूपण, स्वानुभव निरूपण : (सृष्टीचे मूलतत्त्व असलेले ब्रह्मम्हणजे काय आणि याचा स्वानुभव कसा घ्यावा याविषयी समर्थ रामदास स्वामी यांचा अखेरचा संदेश)(लेखक: संत रामदास, भावार्थ निरूपण: भास्करबुवा रामदासी)
  • श्रीरामकृष्ण परमहंस वचन : निवडक जीवन उपदेश : (