top of page
Search

ऑडिओ बुक्स ऐकणे हा आपल्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा

Updated: Sep 23, 2021

वाचनातून घडणाऱ्या ज्ञानसाधनेला गती देण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांसाठी ऑडिओ बुक हे एक अत्यंत सुगम आणि सुलभ असे उत्तम माध्यम आहे. आपली दैनिक नित्यकर्मे करताना, व्यायाम करताना, स्वयंपाक करताना, प्रवास करताना अशा अनेक वेळा आहेत ज्यांचा आपण ऑडिओ बुक ऐकत ऐकत दुहेरी सदुपयोग करू शकतो.
ज्ञान, कर्म, प्रेम याप्रमाणेच भक्ति हादेखील मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. हे सर्व मार्ग परस्परपूरक आणि परस्परावलंबी आहेत. भक्तिमार्गातही श्रवण म्हणजे ऐकण्याला सर्वाधिक महत्व दिले आहे. गुरुमुखातून आलेली विद्या लक्षपूर्वक ऐकणे, ऐकण्यासाठी सतत उत्सुक असणे याला ज्ञानसाधनेत अत्यंत महत्वाचे मानले आहे. आधी श्रुती आणि मग स्मृति ही आपली साहित्य परंपरा आहे. लक्षपूर्वक ऐकलेले दीर्घकाळ स्मरणात राहते. पुनः पुनः ऐकलेले आपसूक तोंडपाठ होते आणि कायमस्वरूपी आपल्या स्मृतीत जिवंत राहते.जगातील महत्वाचे असे सर्व पुरातन धार्मिक साहित्य हे मुख्यतः मौखिक परंपरेनेच आपल्या पर्यन्त पोहोचलेले आहे. ऑडिओ बुकच्या आधुनिक माध्यमातून या मौखिक परंपरेला आपण सर्वदूर पोहोचवू शकतो.

यासाठीच ऑडिओ बुक्स ऐकणे हा आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग व्हायला हवा.


इये श्रवणापरते काही | सुगम सुलभ साधन नाही

ऐकता अवघड ग्रंथही | वाचनापरी उलगडती ||

ऐक श्रोत्या सावधान | जाणतेपणी दे अवधान

श्रवणे होय समाधान | ज्ञानलालसेचे ||

ज्ञान आणि विज्ञान | या दोघा साधन श्रवण

सदा श्रवण मनन | हे तू जाण यथार्थ ||

16 views0 comments
bottom of page